Couple Caught on Pune Highway Displaying Affection Publicly – Video Goes Viral, Police Begin Probe
पुणे जिल्ह्यातील शिंदेवाडी ते खेड शिवापूरदरम्यानच्या महामार्गावर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका दुचाकीवर प्रवास करणाऱ्या कपलचा सार्वजनिक ठिकाणी प्रेमप्रदर्शन करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे’ स्टाईलने कपलने बिनधास्त प्रेमाची प्रचिती दिल्याचे दिसत आहे.
हा प्रकार घडल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, सोशल मीडियावर अशा वर्तनाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महामार्गावर सतत वाहतूक सुरू असताना अशा बेजबाबदार वर्तनामुळे गंभीर अपघात होण्याचा धोका वाढतो, अशी चिंता अनेकांनी व्यक्त केली आहे.
तसंच, सार्वजनिक ठिकाणी असे प्रेमप्रदर्शन केल्यामुळे समाजावर आणि लहान मुलांवर चुकीचा परिणाम होतो, असेही मत नागरिकांनी नोंदवले आहे.
दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, संबंधित कपलचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. लवकरच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे
