Maza Police Times News/24×7

जुन्या दुश्मनीतून वानवडीत तोडफोड; दोघांना पोलिसांची अटक

पुणे, २९ जून २०२५:
वानवडी पोलिसांनी तोडफोड व गंभीर धमकी प्रकरणी संतोष लक्ष्मण राठोड आणि कुणाल मोरे यांना अटक केली आहे. ही घटना २८ जूनच्या मध्यरात्री वानवडीतील गावठाण परिसरात घडली.

तक्रारदार तुकाराम विष्णू कांबळे (रा. वानवडी गावठाण) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचे पूर्वीपासून सिद्धार्थ काकडे या स्थानिक रहिवाशाशी वैर होते. घटनेच्या रात्री, आरोपींनी काकडे यांच्या घराऐवजी चुकून कांबळे यांच्या घरावर हल्ला चढवला आणि खिडक्यांची काच फोडली.

तक्रारीनुसार, आरोपींनी शस्त्रासह परिसरात दहशत निर्माण केली. घटनास्थळी बाचाबाची व गोंधळ झाला. संतोष राठोड आणि सिद्धार्थ काकडे यांच्यातील जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले असून आरोपी काकडे यांना शोधत असल्याची नोंद एफआयआरमध्ये आहे.

Exit mobile version